DAILY CURRENT NEWS -48 years of India's first satellite . भारताच्या पहिल्या उपग्रहाला 48 वर्षे पूर्ण
■ 19 एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.
कारण या दिवशी भारताने जागतिक पटलावर स्वतःला अधिक भक्कमपणे प्रस्थापित करून एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
■ अवकाशात पहिला उपग्रह पाठवण्याची ही उपलब्धी होती.
■ 2023 मध्ये या गौरवशाली कामगिरीला 48 वर्षे पूर्ण होत आहेत.
■ 19 एप्रिल याच दिवशी 1975 साली भारताने रशियाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' प्रक्षेपित केला होता.
आर्यभटा बद्दल:
> हे नाव प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या नावावरून ठेवण्यात आले.
> हे पूर्णपणे भारतात डिझाइन व तयार करण्यात आले होते.
> आर्यभट्ट हा भारताचा पहिला वैज्ञानिक उपग्रह होता.
> हे 19 एप्रिल 1975 रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियनकडून लॉन्च करण्यात आले होते.
हा एक प्रायोगिक उपग्रह होता पण त्याने अंतराळ क्षेत्रातील भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचला.
> हे कापुस्टिन यार येथून सोव्हिएत कॉसमॉस-3एम रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले गेले
> त्याचे वजन फक्त 360 किलो होते
> या उपग्रहावर 3 कोटींहून अधिक खर्च झाला
> या मोहिमेचा कालावधी सुमारे 17 वर्षे होता, त्यानंतर 11 फेब्रुवारी 1992 रोजी याने पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला.
> रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 1976 ते 1997 दरम्यान देशाच्या या यशाची नोंद करण्यासाठी उपग्रहाची प्रतिमा 2 रुपयांच्या नोटेवर कोरली.
> आर्यभट्ट प्रक्षेपणासाठी भारत आणि सोव्हिएत संघाने १९७२ मध्ये करार केला होता.
> आर्यभट्ट हे नाव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निवडले होते.
> त्यासाठी मैत्री आणि जवाहर ही आणखी दोन नावे इंदिरा गांधींना सुचली होती.
> 'आर्यभट्ट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) विकसित केले होते.
