भंडारदरा धरणाची १०० वर्षांची गौरवशाली वाटचाल – इतिहास, वैशिष्ट्ये व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे

भंडारदरा धरण – १०० वर्षांचा इतिहास

१९२६ साली ब्रिटिशांनी फक्त ८४ लाख १४ हजार १८८ रुपये खर्चून भंडारदरा (Wilson Dam) धरण पूर्ण केले. स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना असलेल्या या धरणाने २०२६ मध्ये १०० वर्षे पूर्ण होतील.

भौगोलिक व ऐतिहासिक माहिती

  • स्थान : भंडारदरा, अकोले तालुका, अहिल्यानगर (जुने नाव अहमदनगर)
  • नदी : प्रवरा नदी
  • धरण पूर्णत्वास: १९२६
  • पाणीसाठवण क्षमता: १०,०८६ दशलक्ष घनफूट
  • उंची: २७८ फूट
  • पाणलोट क्षेत्र: ४७ चौ.कि.मी

सिंचन व कालव्यांची माहिती

  • सिंचन क्षेत्र: २३,७७७ हेक्टर
  • डावा कालवा: ७६ किमी
  • उजवा कालवा: ५३ किमी
  • ओझर बंधारा: १८८५ मध्ये बांधलेला

१९७३ मधील बळकटीकरण

  • १३१ बोअर मध्ये शिसे ओतून ५४० टन दाब क्षमतेत वाढ
  • १९४ बोअर मध्ये प्री-स्ट्रेस केबल (२१० टन, १०,५५३ फूट लांब)
  • १४ बटरेस बांधले गेले
  • स्पिल वे गेट – ५३,००० क्युसेक पुरपाण्याचा विसर्ग

तांत्रिक वैशिष्ट्ये

  • स्वित्झर्लंड बनावटीचे सिंचन व्हॉल्व्ह
  • दबाव सहन क्षमता: ७,००० मेट्रिक टन
  • २१ किमी बुडीत क्षेत्र
  • ६० मीटर पर्यंत पाण्याचा दाब
  • ६०% दाब टेकडीवर व ४०% दाब धरण भिंतीवर
  • साम्रद जवळ ३५० मीटर लांबीचा सॅडल डॅम

चित्रपटसृष्टीतील महत्त्व

  • १९४० पासून १०४ चित्रपट३९ गाणी येथे चित्रीत
  • राम तेरी गंगा मैली – ‘तुझे बुलाये ये मेरी बाहे…’ – Umbrella Falls
  • भिंगरी (मराठी चित्रपट) – ‘सजनी ग भुललो मी…’
  • ये धरती चाँद सितारे – रंधा धबधबा

स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे

  • भंडारदरा धरण – १०० वर्षे पूर्ण – १९२६–२०२६
  • ब्रिटिश स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना
  • भारतामधील जुने व मजबूत दगडी धरण
  • सह्याद्री पर्वतावर आधारित इंजिनीअरिंग
  • ‘विल्सन डॅम’ म्हणूनही ओळख